नागपुरात नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काल अनेक ठिकाणी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आज नागपुरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने आंदोलन केले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले तर याठिकाणी काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे आंदोलनाच्या […]

नागपुरात नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काल अनेक ठिकाणी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आज नागपुरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने आंदोलन केले.

नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले तर याठिकाणी काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

देशात कोरोना पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले असून पंतप्रधान मोदीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number