अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू

राज्यात कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्येत घट झाल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. अमरावतीमध्ये कोरोना नियम पाळून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू करण्याचा निर्णय […]

अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू

राज्यात कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्येत घट झाल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत.

अमरावतीमध्ये कोरोना नियम पाळून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अमरावतीमधील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा एकूण २८९७ शाळेतील वर्ग आजपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांवर पुन्हा ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली. मात्र, कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर नेण्यात आला. त्यानंतर आज अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करत अमरावतीमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number