कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे त्या सर्व ठिकाणांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज या नावाने बदलण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी आंदोलकांवर अनेक ठिकाणी विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याची मागणीही खासदार संभाजीराजेंनी केली.


दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे संभाजीराजे संतापले होते. तसेच एकेरी उल्लेख केल्याने रविशंकर प्रसाद यांनी माफी मागितली होती.