आज बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रैंड फिनाले सोहळा पार पडणार आहे. या विशेष सोहळ्यातून बिग बॉस मराठी 6 चा विजेता प्रेक्षकांना मिळणार आहे. 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच रविवारी अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर हा ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळेल. बिग बॉस 6 च्या ग्रँड फिनालेमध्ये जिनिलीया देशमुख आणि अभिषेक बच्चन हा प्रमुख पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी 6’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठी 6 ला यंदाच्या सीझनचे 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. अशातच आज होणाऱ्या ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस 6 च्या 5 फायनलिस्ट पैकी पहिल्या एलिमिनेशनमध्ये बाहेर पडलेल्या सदस्याचे नाव समोर आले आहे. एकीकडे ‘बिग बॉस मराठी 6’ च्या विजेत्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे घरातील सर्वात स्ट्रॉग स्पर्धक बाहेर पडणार आहे.
हेही वाचा- Rakhi Sawant: ‘लग्न नको, पण…’, बिग बॉसच्या घराबाहेर येताच राखीची राकेश बापट कडे अजब मागणी
कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन दाखवले आहे. यात होस्ट रितेश देशमुख यांनी घरातील पाचही सदस्यांना एलिमिनेट होण्यासाठी तब्बल 5 लाखांची ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी बिग बॉसच्या घरातील जेंटलमेन म्हणून ओळखला जाणारा सदस्य राकेश बापट हा पुढे येताना दिसतोय. त्याच्या या कृतीवर उपस्थित असलेल्या इतर सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो. दरम्यान पहिल्या एलिमिनेशनमध्ये घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बिग बॉसने शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “Grand Finale चं पहिलं Eviction होणार… Buzzer दाबून रितेश भाऊंची ऑफर कोण स्वीकारणार?” ‘बिग बॉस मराठी 6’ चा 100 दिवसांचा प्रवास आज अखेर संपणार. या सीझनमध्ये कोण ‘बिग बॉस मराठी 6’ ट्रॉफी उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.