परळीत मुंडे भाऊ बहिणीची बिग फाईट!

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात भाऊ बहिणीची बिग फाईट पाहायला मिळणार आहे. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत, तर राष्ट्रवादी कडून धनंजय मुंडे यांनी रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे परळीत यावेळी ‘काटे की टक्कर’ होण्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांचे मुद्दे 1) पंकजा मुंडे दावा करतात की मागच्या वर्षात परळी मतदार संघात सर्वात जास्त विकास झाला […]

परळीत मुंडे भाऊ बहिणीची बिग फाईट!

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात भाऊ बहिणीची बिग फाईट पाहायला मिळणार आहे. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत, तर राष्ट्रवादी कडून धनंजय मुंडे यांनी रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे परळीत यावेळी ‘काटे की टक्कर’ होण्याचं चित्र आहे.

पंकजा मुंडे यांचे मुद्दे

1) पंकजा मुंडे दावा करतात की मागच्या वर्षात परळी मतदार संघात सर्वात जास्त विकास झाला आहे. त्यामुळे परळीची जनता मला प्रचंड मतांनी विजयी करेल

2 ) बीड जिल्ह्यातील महिलांना बळ दिले आहे. त्या सवलंबी जिल्ह्यात बचतगटाचे मोठे जाळे महिलांनासाठी उभारले आहे. त्यामुळे जिल्हातील सर्व महिला माझ्या पाठीशी राहतील.

नेहमी होत असलेला आरोप-

पंकजा मुंडे  खूप लवकर चीडचीड करतात. त्यामुळे या निवडणूक मध्ये याचा फटका त्यांना बसू शकतो

पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखानाच्या कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसांपासून पगारही दिला नव्हता.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पगार देण्यात येणार आहे. या मुद्द्यावरून विरोधक घेरतील.

परळी – अंबाजोगाई रोडच रखडलेलं काम निवडणुकीत पंकजा मुंडे यांची डोकेदुखी ठरू शकते.

 

धनंजय मुंडे यांचे मुद्दे

1) परळी मतदारसंघात स्थनिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून मोठा विकास केलेला दावा आहे. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात परळी नगर परिषद,पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत.

2) विधान परिषदेत सभागृहात सर्व सामन्याचे प्रश्न उपस्थिती करून त्यांना न्याय मिळवून दिले त्यामुळे शेतकऱ्यांनाची त्यांना मोठी मदत होईल.

3) धनंजय मुंडे यांचं तरुणाईमध्ये मोठं आकर्षण आहे. त्यामुळे तरुणाची साथ त्यांना मिळेल

नेहमी होत असलेला आरोप-

जगमित्र नागा शुगर मिलसाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ते प्रकरण सध्या कोर्टात आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number