Anil Kapoor: पाच लाख पाउंड्सची रॉयल्टी! चित्रपट केला फ्रीमध्ये, तरीही 17 वर्षांनंतर अनिल कपूर यांना मिळतोय लाखोंचा चेक

मात्र करारानुसार त्यांना आजही रॉयल्टीच्या स्वरूपात पे-चेक मिळत असल्याचा खुलासा त्यांनी केला असून हा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Anil Kapoor: पाच लाख पाउंड्सची रॉयल्टी! चित्रपट केला फ्रीमध्ये, तरीही 17 वर्षांनंतर अनिल कपूर यांना मिळतोय लाखोंचा चेक

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अनिल कपूर गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील एका चित्रपटामुळे त्यांना आजही रॉयल्टीच्या स्वरूपात पेमेंट मिळत असल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली असून, हा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

17 वर्षांनंतरही मिळतोय ‘पे-चेक’

हा चित्रपट म्हणजे स्लमडॉग मिलियोनेर, जो 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी केले होते. मुंबईतील झोपडपट्टीत वाढलेल्या एका मुलाच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत देव पटेल झळकले होते, तर अनिल कपूर यांनी लोकप्रिय क्विझ शोच्या होस्ट प्रेम कुमार यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती एका ब्रिटिश प्रॉडक्शन कंपनीने केली होती.

फ्रीमध्ये काम, तरीही मिळते रॉयल्टी

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक रंजक अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘स्लमडॉग मिलियनेयर’साठी त्यांनी सुरुवातीला कोणतेही मानधन घेतले नव्हते. मात्र करारानुसार त्यांना आजही रॉयल्टीच्या स्वरूपात पे-चेक मिळत आहेत.

हेही वाचा: Sonam Wangchuk: सुमारे 170 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांची होणार सुटका; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

अनिल कपूर म्हणाले, “ही गोष्ट मी सर्वांसोबत शेअर करायला हवी. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. दीड दशकाहून अधिक काळ उलटल्यानंतरही मला काल पुन्हा ‘स्लमडॉग मिलियनेयर’साठी पे-चेक मिळाला.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नुकतेच 3000 पाउंड (सुमारे तीन लाख 67 हजार रुपये) इतकी रक्कम मिळाली. ते पुढे म्हणाले, “मी माझा कर नियमित भरतो, त्यामुळे हे सांगू शकतो. या चित्रपटातून मला जवळपास पाच लाख पाउंड मिळणार आहेत. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने करोडपती झालो आहे.”

पैशांसाठी नव्हे, शिकण्यासाठी केला चित्रपट

अनिल कपूर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी हा चित्रपट पैशांसाठी स्वीकारला नव्हता. ते म्हणाले, “हा चित्रपट मी स्वतःला अधिक शिकण्यासाठी केला. मला नव्या पद्धतीने काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. कलाकार म्हणून सतत शिकत राहणे आणि स्वतःला प्रासंगिक ठेवणे मला महत्त्वाचे वाटते.”

यावेळी त्यांनी आणखी एक खुलासा केला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुरुवातीला त्यांना सांगितले होते की ते त्यांचे मानधन परवडवू शकत नाहीत. त्यावर अनिल कपूर यांनी हसत उत्तर दिले होते, “मी तुमच्याकडे पैसे मागितलेच कधी आहेत का?” आणि त्यांनी हा चित्रपट फ्रीमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मात्र या चित्रपटाच्या करारामुळे आजही अनिल कपूर यांना वेळोवेळी रॉयल्टीच्या स्वरूपात पेमेंट मिळत असल्याने, ‘स्लमडॉग मिलियनेयर’ हा त्यांच्या कारकिर्दीतील एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरला आहे.

हेही वाचा: Bus Accident: महामार्गावर भीषण अपघात! 40 प्रवाशांनी भरलेल्या बसचा चुराडा; चालकाचे नियंत्रण सुटले अन्…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number