अनिल देशमुख बदल्यांसाठी यादी द्यायचे; ईडी चौकशीत सीताराम कुंटेंचे विधान

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे त्यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान, अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांची यादी द्यायचे, असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर नोंदविला आहे. ईडी चौकशीदरम्यान सीताराम कुंटे यांनी जबाब नोंदविला की, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तांची यादी अनिल देशमुखच द्यायचे, असे विधान सीताराम कुंटे यांनी केले आहे. […]

अनिल देशमुख बदल्यांसाठी यादी द्यायचे; ईडी चौकशीत सीताराम कुंटेंचे विधान

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे त्यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान, अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांची यादी द्यायचे, असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर नोंदविला आहे.

ईडी चौकशीदरम्यान सीताराम कुंटे यांनी जबाब नोंदविला की, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तांची यादी अनिल देशमुखच द्यायचे, असे विधान सीताराम कुंटे यांनी केले आहे. तसेच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्यामार्फत बदलीचे कामकाज चालायचे असेही कुंटे चौकशीत सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्य बदल्या, नियुक्त्यांमध्ये सगळे मंत्रिमंडळ असल्याचे सीताराम कुंटे म्हणाले. तसेच सीताराम कुंटे यांनी ईडी चौकशीदरम्यान नोंदवलेला जबाब ईडीकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number