ऍड. गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरंगात नेण्यात आले. त्यानंतर आता सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली […]

ऍड. गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरंगात नेण्यात आले. त्यानंतर आता सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर काल (बुधवार) गिरगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. त्यामुळे सदावर्तेंचा जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number