Priya Berde News : ‘काजळमाया’ मालिकेतून अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला, तब्बल 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

स्टार प्रवाह चॅनेलवरील 'काजळमाया' या मालिकेतून प्रिया बेर्डे एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'काजळमाया' मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.<br/> 

Priya Berde News : ‘काजळमाया’ मालिकेतून अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला, तब्बल 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाने आपली वेगळीच छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं मराठी मालिका विश्वात कमबॅक होणार आहे. स्टार प्रवाह चॅनेलवरील ‘काजळमाया’ या मालिकेतून प्रिया बेर्डे एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘काजळमाया’ मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
कोण आहे कनकदत्ता?
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया मालिका होय. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचे एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई आहे. कनकदत्ता सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी, मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी आहे. आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच कनकदत्ताची इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील का, हे   काजळमाया मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Veteran Actor Pankaj Dheer : कर्करोगाशी झुंज अपयशी; अभिनेता पंकज धीर कालवश

मालिकेतील कनकदत्ता भूमिकेविषय प्रिया बेर्डेंनी काय म्हणाल्या? 
काजळमाया मालिकेतील कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,”माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पाहता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरू नका नवी गूढ मालिका काजळमाया 27 ऑक्टोबरपासून रात्री 10. 30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number