Aamir Khan: आमिर खानची 61व्या वाढदिवशी मोठी घोषणा; अभिनयाबाबत घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, चाहत्यांना सुखद धक्का

काही काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर आमिर खान पुन्हा नव्या जोमाने काम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Aamir Khan: आमिर खानची 61व्या वाढदिवशी मोठी घोषणा; अभिनयाबाबत घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई: बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना नेहमीच आतुरतेने प्रतीक्षा असते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटानंतर आमिर पुढे कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता 61व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने भविष्यातील योजनांबाबत काही महत्त्वाचे संकेत दिले असून त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

14 मार्च रोजी वाढदिवसानिमित्त समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये आमिर खानने त्याच्या पुढील कामाबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले की पुढील काळात तो निर्मितीपेक्षा अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून तो विविध कथा आणि पटकथा ऐकत होता आणि अखेर काही चित्रपटांची निवडही त्याने केली आहे. मात्र या चित्रपटांची नावे त्याने अद्याप जाहीर केलेली नाहीत.

चाहत्यांचे आभार मानताना आमिर म्हणतो, “माझ्या सर्व चाहत्यांना खूप प्रेम. तुम्ही दिलेले प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मागील सहा महिन्यांपासून मी सातत्याने पटकथा ऐकत होतो आणि आता काही चित्रपट निवडले आहेत, ज्यामध्ये मी काम करणार आहे.” त्याने पुढे सांगितले की त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे दैनंदिन काम आता अपर्णा पुरोहित पाहणार असून त्यामुळे त्याला अभिनयासाठी अधिक वेळ देता येणार आहे.

हेही वाचा: Electricity Rules: LPG-PNG नंतर आता वीज क्षेत्रात बदल; काय आहे 'वीज दुरुस्ती नियम 2026'? या बदलांचा उद्योगांवर होणार मोठा परिणाम

दरम्यान, आमिर खानने त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होत असलेल्या काही चित्रपटांचाही उल्लेख केला. त्यामध्ये ‘एक दिन’ आणि ‘लाहौर 1947’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘एक दिन’ या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खान प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय ‘लाहौर 1947’ हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘अति सुंदर’ नावाचा आणखी एक चित्रपटही तयार होत असून तो यावर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

एकूणच, काही काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर आमिर खान पुन्हा नव्या जोमाने काम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. आगामी काळात तो अधिक सक्रियपणे अभिनय करताना दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

हेही वाचा: Donald Trump: मोजतबा खामेनी जिवंत नाही? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा अन् 83 कोटींचे बक्षीस; म्हणाले 'जिवंत असाल तर…'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number