कोरोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक, सामाजिक अडचणींसाठी सामान्य नागरिकांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. तर प्रसंगांतून अनेक जण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. दरम्यान, देशातील तीन वर्षांत आत्महत्या झालेल्यांची आकडेवारी समोर आली आहे.
देशात गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल २५ हजार आत्महत्यांची घटना घडली असल्याची समोर आले आहे. देशात २०१८ ते २०२० या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली आहे.