मुंबई , १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचं वातावरण सुरु आहे अचानक कुठून ना कुठून ऐकायला मिळते आज अमुक अमुक अभिनेता अभिनेत्रीचं लग्न झालं किंवा साखरपुढा केला दरम्यान अनेक कलाकारांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. यानंतर आता मराठीतील अजून एका कलाकाराने साखरपूडा उरकला आहे. गुढीपाडव्याचा मूहूर्तावर सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील अभिषेक गावकरने साखरपुडा केला आहे.

झी मराठीवरील नुकतीच गाजणारी मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ ही प्रेक्षकांच्या आवडीची आहे मालिकेतील श्रीनू हे पात्र अभिषेक गावकर साकारत आहे. अभिषेकनं नुकताच समाज माध्यमांवरील प्रभावाक ( इन्फ्लुएनसर ) सोनाली गुरवसोबत साखरपुडा केला आहे. सोनाली ही एक प्रसिद्ध कंटेन्ट क्रीएटर आहे.सोनाली नेमही वेगवेगळ्या विषयाला धरून मनोरंजक विनोदी व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर पोस्ट करत असते.
गेल्या काही वर्षांपासून अभिषेक आणि सोनाली एकमेकांना डेट करत होते . त्यानंतर त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे आणि त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांनी भरगोस कंमेंट्सचा वर्षाव करून शुभेच्छा आणि प्रेम दिल आहे.