राशी खन्नाने हैदराबादमध्ये घेतलं नवीन घर

मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : युवा स्टार राशी खन्ना हिने हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतले असून तिच्या घराच्या पूजेचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने आपले कुटुंब आणि मित्रांसह वास्तू शांती पूजा केली. या खास क्षणांचे काही फोटो राशीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिची आई आणि काही जवळचे […]

राशी खन्नाने हैदराबादमध्ये घेतलं नवीन घर

मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : युवा स्टार राशी खन्ना हिने हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतले असून तिच्या घराच्या पूजेचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने आपले कुटुंब आणि मित्रांसह वास्तू शांती पूजा केली. या खास क्षणांचे काही फोटो राशीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिची आई आणि काही जवळचे नातेवाईक दिसत आहेत. हे पाहून चाहत्यांनी राशीचे भरपूर कौतुक केले.

नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर योद्धा मध्ये चमकलेली ही अभिनेत्री ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसते.

 या घरासोबतच राशीचं हरियाणामध्येही मोठं घर आहे. तसंच राशीला लक्झरी लाइफची विशेष आवड आहे. तिच्याकडे लक्झरी कारचं बरंच मोठं कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये ऑडी क्यू7, बीमएडब्ल्यू 520डी आणि रेंज रोवर वोग यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number