मणिपूरमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. जवळपास ५०० राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्राद्वारे शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीदेखील या विश्लेषकांनी केली आहे. या पत्रामध्ये पंतप्रधानांनी या प्रकरणावर मौन सोडून जबाबदारी घेण्याची मागणीदेखील या विश्लेषकांनी केली आहे. तसेच या हिंसेला तात्काळ थांबण्याचे आवाहनदेखील या पत्राद्वारे करण्यात आले आहे. या हिंसेमुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तसेच लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“अनेक प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे समाजामध्ये हिंसा पसरवण्याचे काम सध्या सुरु आहे, जे अत्यंत खेदजनक आहे. वृत्तानुसार, बहुसंख्य मेईतेई समुदायाने कुकियो समाजीतील लोकांनी त्यांच्या समाजीतील महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच कुकियो या समाजाकडून ‘बलात्कार करा, अत्याचार करा’ अशा घोषणा देत जमाव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील या समाजाने म्हटलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा हिंसाचार ताबडतोब थांबवण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत.”