गोळीबारात अमेरिका हादरली

अमेरिकेच्या टेक्सास येथील प्राथमिक शाळेतील गोळीबाराने अमेरिका हादरली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका युवकानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात १८ मुलांसह २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर युवक १८ वर्षांचा असून मशीनगननं शाळेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोराला पकडत असताना १८ वर्षीय हल्लेखोर युवकाचा […]

गोळीबारात अमेरिका हादरली

अमेरिकेच्या टेक्सास येथील प्राथमिक शाळेतील गोळीबाराने अमेरिका हादरली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका युवकानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात १८ मुलांसह २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर युवक १८ वर्षांचा असून मशीनगननं शाळेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोराला पकडत असताना १८ वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दुख: व्यक्त केले आहे. या घटनेबद्दल एक धक्कादायक प्रकार म्हणजे त्याने प्रथम आपल्या आजीवर गोळीबार केला. साल्वोदोर रामोस या त्या मुलाचे नाव आहे. तो अमेरिकेचा नागरिक असुन तो एक विद्यार्थी आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये रामोसचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात एक तपकिरी केसांचा तरूण दिसत आहे.

पहिली घटना हल्लेखोर युवकाच्या घरी घडली आहे. त्याने प्रथम आपल्या आजीला गोळी घालून ठार मारले आहे, अशी माहिती टेक्सास सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी एरिक एस्ट्राडा यांनी दिली आहे. आजवर गोळीबार झाल्याने नंतर तिला उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आल्याचेही ते म्हणाले आहे.

आपल्या आजीवर गोळीबार केल्यानंतर त्या तरूणाने बुलेटप्रुफ जॅकेट घालून त्याने रायफलसह कारमधून घटना स्थाळावरून पळ काढला आणि तो तेथील रॉब एलिमेंट्री स्कूलमध्ये गेला. तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या हातातून तो निसटला नंतर तो शाळेमध्ये गेला आणि अंदाधुंद गोळीबार केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number