महिलेने रचला सामूहिक बलात्काराचा खेळ; नेमकं घडलं काय?

एका महिलेवर गोळी झाडून बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी करून सुरू केली. परंतु सत्य समोर आल्यावर पोलिसही चक्रावून गेले.

महिलेने रचला सामूहिक बलात्काराचा खेळ; नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेश : एका महिलेवर गोळी झाडून बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी करून सुरू केली. परंतु सत्य समोर आल्यावर पोलिसही चक्रावून गेले. संबंधित महिलेवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. इतकंच नाही तर गोळी झाडल्याची गोष्ट खरी वाटावी म्हणून या महिलेने बंदुकीची गोळी स्वत:च्या छातीत रोपण केली होती. 29 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या बरेली पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली. एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिच्यावर गोळी झाडल्याचे पीडित महिलेच्या भाचीने सांगितले. 

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मात्र तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे समोर आले. तसेच ज्या ठिकाणी अत्याचार झाला असल्याचे महिलेने सांगितले. त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. ज्या ठिकाणाहून अपहरण झाल्याचा दावा ही महिला करत होती. त्या ठिकाणाहून ती एका रिक्षातून प्रवास करत असल्याचे महिला दिसून आले. त्यानंतर पोलिसांना संबंधित महिलेला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी हा सगळा बनाव असल्याची कबुली महिलने दिली.

हेही वाचा : Prashant Koratkar Bail : प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका

या महिलेने एका लोकप्रतिनिधीला ब्लॅकेमेल केल्याप्रकरणी कोर्टात केस सुरू होती. त्याचा लवकरच निकाल लागणार होता. हा निकाल विरोधात लागेल अशी भिती महिलेला होती. यातून तिने हा बनाव रचल्याचे समोर आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number