किराणा दुकानात वाईन; मविआचे धोरण बदलणार

किराणा दुकानात नागरिकांसाठी अत्यावश्यक गोष्टी मिळतात मात्र आता लवकरच बेकरी, किराणा दुकानात वाईनची विक्री होताना दिसणार आहे. राज्य सरकार, दैनंदिन गरजेची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करण्याच्या विचारात आहे. राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वाईनचा खप वाढावा म्हणून राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार […]

किराणा दुकानात वाईन; मविआचे धोरण बदलणार

किराणा दुकानात नागरिकांसाठी अत्यावश्यक गोष्टी मिळतात मात्र आता लवकरच बेकरी, किराणा दुकानात वाईनची विक्री होताना दिसणार आहे. राज्य सरकार, दैनंदिन गरजेची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करण्याच्या विचारात आहे.

राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वाईनचा खप वाढावा म्हणून राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार केले आहे. त्याबद्दलची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यातल्या वाईनवर आकारले जात नसलेले उत्पादन शुल्क आता १० टक्के दराने आकारले जावे, असा प्रस्ताव या धोरणात ठेवण्यात आला आहे.

वाईन खरेदी करताना एक लिटर वाईनवर १० रुपये अबकारी कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे पाच कोटींचा महसूल जमा होणार आहे. तसेच वाईनच्या विक्रीवरही लक्ष ठेवणे सरकारला सोपे होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे विरोधकांच्या प्रतिक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number