हेडमास्तर कुठे हरवले?; चित्रा वाघ यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे भाजपचे जितेन गजारीया यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर अद्याप गुन्हा का झाला नाही? असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. चित्रा […]

हेडमास्तर कुठे हरवले?; चित्रा वाघ यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे भाजपचे जितेन गजारीया यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर अद्याप गुन्हा का झाला नाही? असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे.

चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहीत महाविकास आघाडी सरकारव टीका केली आहे. त्यांनी जितेन गजारिया यांनी केलेले ट्विट चुकीचे असल्याचे मान्य केले. मात्र महिला खासदारांवर शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना केलेली शिवीगाळ आक्षेपार्ह आहे. गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्याकडून असभ्य शेरेबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर  गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ पत्रात म्हणतात की, अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजयजी राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तसेच विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तरसारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत?, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number