Whatsapp Account: मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता पालकांचा ‘वॉच’! ‘पॅरेंट मॅनेज अकाउंट’ फिचर काय आहे? पाहा सेटअप करण्याची सोपी पद्धत

व्हॉट्सॲपने ‘पॅरेंट मॅनेज अकाउंट’ फीचर सादर करून पालकांना मुलांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा दिली आहे.

Whatsapp Account: मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता पालकांचा ‘वॉच’! ‘पॅरेंट मॅनेज अकाउंट’ फिचर काय आहे? पाहा सेटअप करण्याची सोपी पद्धत

व्हॉट्सॲप (WhatsApp) हे भारतासह जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप असून मेटाकडील हे ॲप सतत नवे फीचर्स सादर करत असते. मात्र, मुलांकडून व्हॉट्सॲपच्या वापराबाबत सुरक्षा आणि गोपनीयतेचे प्रश्न कायमच उपस्थित राहतात. याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने ‘पॅरेंट मॅनेज अकाउंट’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आणि मार्गदर्शन करणे शक्य होते.

पॅरेंट मॅनेज अकाउंट ही अशी सुविधा आहे, जी मुलांना पालकांच्या देखरेखीखाली व्हॉट्सॲप वापरण्यास मदत करते. या प्रक्रियेत पालकांचे व्हॉट्सॲप अकाउंट मुलाच्या अकाउंटशी लिंक केले जाते. त्यामुळे पालकांना काही महत्त्वाच्या सेटिंग्ज, प्रायव्हसी पर्याय आणि सुरक्षा नियंत्रण हाताळता येतात. मात्र, हे फीचर चॅट वाचण्यासाठी नसून फक्त अकाउंटच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

हे अकाउंट सेटअप करण्यासाठी सर्वप्रथम मुलाच्या अँड्रॉइड किंवा iOS डिव्हाइसवर व्हॉट्सॲप इंस्टॉल किंवा उघडावे लागते. त्यानंतर अकाउंट नोंदणी प्रक्रिया सुरू करून मुलाचा मोबाईल नंबर टाकावा आणि SMS द्वारे आलेला OTP वापरून तो व्हेरिफाय करावा.

हेही वाचा: Kidney Stone: मीठ, मांसाहार आणि उन्हाळा; किडनी स्टोनसाठी 'हे' समीकरण ठरतंय कारणीभूत, कसं? वाचा सविस्तर

पुढील टप्प्यात ‘पॅरेंट मॅनेज अकाउंट’ हा पर्याय निवडून पालकांचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर पालकांच्या व्हॉट्सॲपवर सुपरविजनसाठी रिक्वेस्ट येते, जी त्यांनी स्वीकारल्यानंतर मुलाचे अकाउंट त्यांच्या अकाउंटशी लिंक होते.

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही सुविधा महत्त्वाची आहे. व्हॉट्सॲपच्या माहितीनुसार, पॅरेंट मॅनेज अकाउंटमध्येही चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित राहतात. त्यामुळे गोपनीयता अबाधित राहते.

या फीचरमुळे पालकांना मुलांच्या अकाउंटच्या प्रायव्हसी सेटिंग्ज नियंत्रित करता येतात, त्यांच्या वापरावर योग्य मार्गदर्शन करता येते आणि सुरक्षा उपाय योग्य प्रकारे लागू आहेत की नाही याची खात्री करता येते. डिजिटल युगात मुलांचा सुरक्षित, जबाबदार आणि नियंत्रित वापर सुनिश्चित करण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. 

हेही वाचा: Sushma Andhare : भोंदू खरातप्रकरणी सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक; नाव जोडलेल्या संबंधीत राजकीय नेत्यांना सुनावले खडेबोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number