नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल नुकताच पार पडला. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले आहे. गोव्यातही भाजपाने झेंडा रोवला आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरमध्ये फडणवीसांचे जंगी स्वागत करण्यात आले तर रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी […]

नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल नुकताच पार पडला. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले आहे. गोव्यातही भाजपाने झेंडा रोवला आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरमध्ये फडणवीसांचे जंगी स्वागत करण्यात आले तर रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी हा स्तकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात स्वीकारत आहे. हे श्रेय त्यांचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बाबत जी काही सकारत्मकता, विश्वास आहे हा त्याचा विजय आहे. जनतेने दिलेले प्रेम त्यासाठी मी आभारी आहे.

फडणवीस म्हणाले, शक्तीप्रदर्शनापेक्षा हा एक आनंदोत्सव आहे. हा आनंदोत्सव साजरा होणारच. आमची लढाई शिगेला पोहचत आहे. येत्या काळात राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत आमची शक्ती दिसेल.

ते म्हणाले, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. हे बहुमत म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या कामाची दिलेली पावतीच आहे. दरम्यान, काँग्रेस जनतेपासून तुटली आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा परिवर्तनाची लाट येणार आहे. २०२४साली महाराष्ट्रात बहुमताचे सरकार येणार असल्याचा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number