Registrar Office Raid: 1 कोटी 23 लाखांचे दागिने, 25 लाख रुपयांची रोकड…; उपनिबंधक कार्यालयात कोट्यवधींचा खजिना उघडकीस

तपास अधिक खोलवर गेल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Registrar Office Raid: 1 कोटी 23 लाखांचे दागिने, 25 लाख रुपयांची रोकड…;  उपनिबंधक कार्यालयात कोट्यवधींचा खजिना उघडकीस

तेलंगणा मधील वारंगळ जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात मोठ्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड झाला आहे. अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau, ACB) ने टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची संपत्ती, अनियमित व्यवहार आणि अनधिकृत एजंटांचे जाळे उघडकीस आले आहे.

2 एप्रिल 2026 रोजी वारंगळ (ग्रामीण) येथील उपनिबंधक कार्यालयावर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान कार्यालय परिसरात तब्बल 20 अनधिकृत एजंट आणि क्लर्क काम करत असल्याचे आढळले. याशिवाय 47,450 रोख रक्कम आणि 70 नोंदणी न झालेली कागदपत्रे जप्त करण्यात आली, ज्यामुळे जमीन आणि मालमत्ता व्यवहारात मोठ्या गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपास अधिक खोलवर गेल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या. उपनिबंधक अधिकारी-I जमालापुरम रामचंद्र राव आणि अधिकारी-II दावुलुरी आनंद यांच्यातील कथित व्हॉट्सॲप चॅट्स मिळाले आहे. या चॅट्समध्ये गेल्या वर्षभरात फोनपेद्वारे सुमारे 42.03 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले, जे कथित बेकायदेशीर व्यवहारांकडे निर्देश करतात.

हेही वाचा: जगायचे असेल तर 48 तासात बाहेर पडा; अमेरिकेच्या इशाऱ्याने जग हादरले! इराण-अमेरिका युद्धात आता काय होणार?

तसेच, 204 नोंदणीकृत कागदपत्रे नागरिकांना देण्यात यायला हवी होती, मात्र ती अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याचेही आढळले. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

छापेमारीनंतर ACB ने संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवरही धाडी टाकल्या. या कारवाईत 24.61 लाख रोख रक्कम, 819.5 ग्रॅम सोन्याचे दागिने (सुमारे 1 कोटी 23 लाख रुपये) आणि 2.6 किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय दावुलुरी आनंद यांच्या घरातून 30 लाख रुपयांच्या मुदतठेवीसंबंधी कागदपत्रेही मिळाली.

या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून ACB कडून अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल राज्य सरकारकडे पुढील कारवाईसाठी सादर केला जाणार आहे. या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून संबंधितांवर कडक कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: तपासात असहकार, प्रश्नांवर 'नाही'चा पाढा; भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडीत Silent Mode रणनीती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number