Virat Kohli: किंग कोहलीच्या ‘त्या’ लाईकवर जर्मन इन्फ्लुएन्सरने अखेर मौन सोडलं; म्हणाली, ‘हे खूपच विचित्र…’

यानंतर लिझलॅझने प्रतिक्रिया देत विराटचा हेतू नसावा, पण त्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपण आभारी असल्याचे म्हटले.

Virat Kohli: किंग कोहलीच्या ‘त्या’ लाईकवर जर्मन इन्फ्लुएन्सरने अखेर मौन सोडलं; म्हणाली, ‘हे खूपच विचित्र…’

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका ‘लाईक’मुळे चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर अवनीत कौर हिच्या फोटोला लाईक केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विराटने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्टीकरण देत, “फीड क्लिअर करताना अल्गोरिदममुळे चुकून इंटरॅक्शन नोंदले गेले असावे. त्यामागे कोणताही हेतू नव्हता,” असे म्हटले होते.

आता काही महिन्यांनंतर विराट पुन्हा एका अशाच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या अकाउंटवरून दक्षिण आफ्रिका-जर्मनीतील गायिका आणि इन्फ्लुएंसर लिझलॅझ हिच्या फोटोला लाईक करण्यात आल्याचे चाहत्यांनी पाहिले. काही वेळानंतर विराटने तो लाईक काढून टाकला, पण तोपर्यंत ही बाब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

या संपूर्ण प्रकरणावर आता लिझलॅझने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मी सकाळी उठले आणि अचानक माझे नाव सर्वत्र चर्चेत होते. विराटने फोटो कधी लाईक केला, हेही मला माहीत नव्हते. मला ही गोष्ट बातम्यांमधून समजली.” तिने सांगितले की, लोकांनी विविध प्लॅटफॉर्मवरील बातम्या तिला पाठवल्या आणि तिच्या डीएममध्ये मोठ्या प्रमाणात मेसेज आले.

हेही वाचा: Mumbai Illegal Schools: मुंबईत धक्कादायक प्रकार; 164 शाळा अनधिकृत, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

लिझलॅझने यापूर्वी एका व्हिडिओमध्ये विराट कोहलीची चाहती असल्याचे सांगितले होते. ती 2025 मध्ये भारतात आली होती. तिची एक जवळची मैत्रीण बंगळूर मध्ये राहत असल्याने ती भारतात आली आणि काही आठवडे राहण्याचा विचार करत होती. मात्र भारत आवडल्याने ती अनेक महिने येथेच राहिली. या काळात तिने भारतामधील विविध शहरे आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली.

भारत दौऱ्यातच तिला क्रिकेटची ओळख झाली. ती म्हणाली, “मी याआधी कधी क्रिकेट पाहिले नव्हते. मी दक्षिण आफ्रिकेत जन्मले, पण जर्मनीत वाढले, जिथे फुटबॉल सर्वात लोकप्रिय आहे. आयपीएलच्या काळात मी माझ्या बंगळूरमधील मित्रांसोबत सामने पाहू लागले. त्यानंतर मी RCB ची चाहती बनले. विराट कोहली हा खूपच रोमांचक खेळाडू आहे, त्यामुळे त्याने फोटो लाईक केल्याने मला आनंद झाला.”

विराटने नंतर लाईक काढून घेतल्यावर तिला वाईट वाटले का, असे विचारले असता ती म्हणाली, “मला खरं तर त्याच्यासाठी थोडे वाईट वाटले. ही गोष्ट इतकी मोठी कशी झाली, हे मला समजले नाही. कदाचित त्याचा तसा हेतू नसावा. पण तरीही त्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.”

या घटनेनंतर भारतात लिझलॅझची लोकप्रियता वाढली आहे. तिला सोशल मीडिया आणि मीडियातून मोठे लक्ष मिळत आहे. तिने सांगितले की, भारतातून तिला अनेक कामांच्या ऑफर्स येत आहेत. संगीत आणि व्ह्लॉगिंगमध्ये तिची विशेष आवड असल्याने, भविष्यात भारतात पुन्हा येण्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे. 

हेही वाचा: Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना 'सुवर्ण'संधी! ऐन सणाआधी सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण; पाहा आजचे दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number