दोन दिवसांपूर्वी अकोला–बडनेरा रेल्वेत एका तरुणीने छेडछाड केल्याचा आरोप करत तरुणाच्या हातात बांगडया भरून त्याला लाली लिपस्टिक लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे. संबंधित तरुणीच्या बहिणीने व्हिडिओद्वारे समोर येत त्या तरुणाची जाहीर माफी मागितली असून, गैरसमजामुळे ही घटना घडल्याचे सांगितले आहे. या नव्या घडामोडीनंतर संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘अकोला-बडनेरा’ रेल्वेत छेड काढणाऱ्या छेड काढणाऱ्या रोमियोला तरुणीने अद्दल घडवली. अकोला-बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात तरुणीने बांगड्या भरवल्या. एका पॅसेंजर रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने गांधीगिरी पद्धतीने धडा शिकवला. इतकंच नव्हे तर ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत. शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो’ ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला चक्क तरुणीने आणि प्रवाशांनी मिळून गांधीगिरी स्टाईलने चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी तरुणीच्या संयमाचे आणि धाडसाचे कौतुक केले.