ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे पत्रकार विनोद दुआ यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिक दुआ यांनी ही माहिती दिली आहे. तसेच उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मल्लिक दुआ यांनी सांगितले  आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पत्रकार […]

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे पत्रकार विनोद दुआ यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिक दुआ यांनी ही माहिती दिली आहे. तसेच उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मल्लिक दुआ यांनी सांगितले  आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पत्रकार विनोद दुआ यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामधून सावरल्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा खालवाली. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांच्यासह त्यांच्या पत्नीलासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

पत्रकारितेच्या आयुष्यात ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी दूरदर्शन, एनडीटीव्ही यांसह अनेक माध्यमांसाठी मोलाचे काम केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number