Iran Israel US War: थेट युद्धभूमीतून मोठी बातमी; 60 वर्षांचा वारसा असलेले अमेरिकेचे KC-135 विमान इराकमध्ये कोसळले, शत्रूची चाल की अपघात?

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे KC-135 एअर रिफ्युएलिंग लष्करी विमान इराकच्या पश्चिम भागात दुर्घटनाग्रस्त झाले आहे.

Iran Israel US War: थेट युद्धभूमीतून मोठी बातमी; 60 वर्षांचा वारसा असलेले अमेरिकेचे KC-135 विमान इराकमध्ये कोसळले, शत्रूची चाल की अपघात?

इराक: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकन लष्कराचे KC-135 एअर रिफ्युएलिंग विमान इराकच्या पश्चिम भागात दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) गुरुवारी दिली. या घटनेनंतर तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून विमानातील क्रू सदस्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले दुसरे विमान सुरक्षितपणे उतरल्याने संभाव्य मोठा धोका टळला.

सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार ही घटना इराकच्या हवाई क्षेत्रात घडली आणि ती 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या लष्करी मोहिमेचा भाग होती. या मोहिमेदरम्यान दोन विमाने सैनिकांच्या हालचालीसाठी तैनात होती. त्यापैकी एक KC-135 विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले, तर दुसरे विमान सुरक्षितपणे बेसवर उतरले. दुर्घटनेनंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले असून लष्करी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासानुसार हा अपघात शत्रूच्या हल्ल्यामुळे किंवा गोळीबारामुळे झालेला नसल्याचे सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे. “हा अपघात कोणत्याही शत्रूच्या कारवाईमुळे किंवा मित्रदेशाच्या फायरिंगमुळे झालेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: MS Dhoni : IPL 2026 आधी CSK फॅन्ससाठी आनंदाची बातमी! 'त्या' प्रकरणातून धोनीला क्लिन चीट

KC-135 हे अमेरिकन वायुसेनेचे अत्यंत महत्त्वाचे एअर-टू-एअर रिफ्युएलिंग विमान मानले जाते. गेल्या सुमारे 60 वर्षांपासून हे विमान विविध लष्करी मोहिमांमध्ये वापरले जात आहे. या विमानात सामान्यतः तीन क्रू सदस्य असतात. पायलट, को-पायलट आणि इंधन भरण्याची ‘बूम’ प्रणाली नियंत्रित करणारा ऑपरेटर. काही विशेष मोहिमांमध्ये नेव्हिगेटरही असतो. या विमानात कमाल 37 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील तणावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकेला आणखी एक धक्का बसला होता. अमेरिकन लष्कराचे तीन F-15E फायटर जेट्स कुवैतमध्ये चुकून पाडण्यात आल्याची माहिती सेंट्रल कमांडने दिली होती. ही घटना ‘फ्रेंडली फायर’ची असल्याचे सांगितले गेले, म्हणजे कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चुकून या विमानांवर कारवाई केली.

तथापि, त्या घटनेत सर्व सहा एअरक्रू सदस्यांनी पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित बाहेर पडत जीव वाचवला होता. कुवैतनेही ही चूक मान्य करत अमेरिकन लष्कराला मदत केली असल्याचे सेंट्रल कमांडने सांगितले. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे जागतिक पातळीवर चिंतेने पाहिले जात आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजे अडकली? इराणच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींची थेट चर्चा, काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number