Shocking Incident: ‘माझ्यावर आधी अत्याचार कर आणि मग…’ ; महिलेने रचला स्वतःच्याच खुनाचा कट

ब्रिटनमधील सोनिया एक्सेल्बी ही मानसिक त्रासाने अमेरिकेत गेल्यानंतर मृत अवस्थेत सापडली. तपासात तिने स्वतःची हत्या घडवून आणण्यासाठी एका व्यक्तीला शोधल्याचे समोर आले. प्रकरणाने खळबळ उडाली.

Shocking Incident: ‘माझ्यावर आधी अत्याचार कर आणि मग…’ ; महिलेने रचला स्वतःच्याच खुनाचा कट

Shocking Incident: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात ब्रिटनमधून आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला हा प्रकार खून आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. मात्र तपास जसाजसा पुढे गेला तसतसे या मृत्यूमागील सत्य अधिकच विचित्र आणि हादरवणारे असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिला सोनिया एक्सेल्बी (वय 32) ही मुळची ब्रिटनमधील असून डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत होती.

मानसिक तणावातून घेतला भीषण निर्णय

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गेल्या काही महिन्यांपासून गंभीर मानसिक तणावात होती. कुटुंबीयांनी तिच्या वागण्यात मोठे बदल झाल्याचे लक्षात घेतले होते, पण तिने कोणालाही आपल्या मनातील भीषण विचारांबद्दल काही सांगितले नव्हते. अखेर ती एकटीच अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आली आणि काही दिवसांनी ती रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत सापडली.

हेही वाचा:Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात इरफान मुख्य सूत्रधार; ब्रेनवॉश करायचा आणि…

व्हिडिओतून उलगडले काळे सत्य

मृत्यूपूर्वी सोनियाने स्वतः एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर स्पष्ट जखमा दिसत होत्या. ती सतत रडत होती आणि स्वतःबद्दल अत्यंत नकारात्मक बोलत होती. तिच्या मते, तिने आयुष्यात अनेक लोकांना दुखावले होते आणि त्यामुळे तिला आपले जीवन संपवायचे होते.

याच व्हिडिओमध्ये ड्वेन हॉल नावाचा 53 वर्षीय अमेरिकन पुरुष दिसत होता. तो सोनियाला अनेक प्रश्न विचारताना दिसतो. “तुला कसं मरायचं आहे?” या प्रश्नाला सोनियाने थेट “चाकूने भोसकून” असे उत्तर दिल्याचे तपासात समोर आले आहे.

ड्वेन हॉलचा धक्कादायक दावा

अटक करण्यात आलेल्या ड्वेन हॉलने पोलिसांना सांगितले की सोनियाने त्याच्याकडे स्वतःवर बलात्कार करण्याची आणि नंतर तिची हत्या करण्याची विनंती केली होती. सुरुवातीला त्याने नकार दिला पण नंतर तिच्या आग्रहामुळे तो तयार झाला, असा त्याचा दावा आहे. मात्र पोलीस या दाव्याकडे अत्यंत गंभीरतेने पाहत असून त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Crime News : तिच्या हट्टापायी गेला मुलांचाही जीव; नवऱ्यानं पत्नीसह स्वतःच्याचं दोन्ही मुलांना संपवलं

कुटुंबाची तक्रार आणि पोलिसांची कारवाई

सोनिया 10 ऑक्टोबरला फ्लोरिडात आली होती आणि 13 ऑक्टोबरला ब्रिटनला परतण्याचे तिने कुटुंबाला सांगितले होते. मात्र ती परतली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तातडीने तक्रार दाखल केली. तपास सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच तिचा मृतदेह एका खोल कबरीत आढळून आला.

पोलीसांच्या म्हणण्यानुसार, सोनियाचा मानसिक त्रास इतका वाढला होता की तिने स्वतःची हत्या करण्यासाठी कोणीतरी शोधण्यास सुरुवात केली होती. त्या शोधातच तिची ओळख ड्वेन हॉलशी झाली आणि तिने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा संदेश

या संपूर्ण प्रकरणाने मानसिक आरोग्य किती गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तज्ञांच्या मते, योग्य वेळी मदत मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात. सोनियाच्या मृत्यूने जगभरात मानसिक आरोग्याविषयी नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number