सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकांमुळे संतप्त व्यापाऱ्यांचा रस्ता रुंदीकरणाविरोधात बंद

पालघरमधील वाडा शहराच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी 16 मीटर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे रुंदीकरणात येणारी बांधकामे व्यापाऱ्यांनी तोडावीत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेविरोधात आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये मुख्य रस्त्यालगतची दुकाने बंद होती […]

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकांमुळे संतप्त व्यापाऱ्यांचा रस्ता रुंदीकरणाविरोधात बंद

पालघरमधील वाडा शहराच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी 16 मीटर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे रुंदीकरणात येणारी बांधकामे व्यापाऱ्यांनी तोडावीत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेविरोधात आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये मुख्य रस्त्यालगतची दुकाने बंद होती तर उर्वरित बाजारपेठ मात्र सुरळीतपणे सुरु आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाडा- देवगाव रस्त्याचे काम हाती घेतलं आहे. वाडा शहरातील मुख्य रस्त्याचे 15 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र हे रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकसूत्रता न ठेवता काही व्यापाऱ्यांना झुकतं माप देत रुंदीकरण कमी केलं होतं.

त्यावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगरपंचायत यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित बैठक घेऊन नियमाप्रमाणे प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार काम करण्याच्य सूचना केल्या होत्या.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी १६ मीटर जागा मोकळी करण्यासंदर्भात सूचना फलक लावत आजपासून बांधकाम तोडण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते. मात्र त्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आजपासून बंद पुकारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number