भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमात भाष्य करताना त्यांनी हे विधान केले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, ‘ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३१ डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य केंद्रीत केले आहे. १ जानेवारी रोजी देश कोरोनामुक्त असणार आणि आमचे महाराष्ट्रासाठी कमिटमेंट आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे उघड करून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त असेल. आज दिवाळी आहे, परंतु १ जानेवारीला पाडवा असेल,’ असे सोमय्या म्हणाले.
अजित पवार यांचे जावई आणि कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा केले असल्याची माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिली होती. तसेच सोमय्यांनी दावा केला आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट येथील निर्मल इमारतीतील कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.