‘नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री सरकारमध्ये नाहीत’ – नवाब मलिक

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम  आहे. ते पडण्याचा प्रश्नच नाही. कारण, घाबरून पक्ष सोडणारे नारायण राणेसारखे भित्रे मंत्री या सरकारमध्ये नाही आहेत. असा खोचक टोला नवाब मलिकांनी नारायण राणेंवर […]

‘नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री सरकारमध्ये नाहीत’ – नवाब मलिक

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम  आहे. ते पडण्याचा प्रश्नच नाही. कारण, घाबरून पक्ष सोडणारे नारायण राणेसारखे भित्रे मंत्री या सरकारमध्ये नाही आहेत. असा खोचक टोला नवाब मलिकांनी नारायण राणेंवर लगावला आहे.

  नवाब मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते सतत महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असे सागंत आहेत. १५ दिवस, दोन महिने, वर्ष अशा अनेक तारखा देऊन झाल्या आहेत. तरीही महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. या सरकारमध्ये नारायण राणे साहेंबासारखे भित्रे मंत्री राहिलेले नाहीत. जे भित्रे होते, ते पक्षातून निघून गेले. परंतु आता भाजपने यंत्रणांचा कितीही वापर केला अथवा भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीही काहीही फरक पडणार नाही. आम्ही घाबरणार नाही, असे मलिकांनी ठणकावून सांगितले  आहे.

  महाविकास आघाडी पाच वर्षे पूर्ण करू शकत नाही. तसेच लोकांची कोणतीही कामे हे सरकार करत नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेत बरसण्याचा अधिकार नाही. अशी टीका नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. त्यामुळे या टीकेला प्रत्युत्तर देत नवाब मलिकांनी पक्ष सोडणारे नारायण राणे यांसारखे भित्रे मंत्री सरकारमध्ये नाहीत असा चिमटा काढला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number