Bangladesh Hindu Violence : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र सुरूच; दीपू दासनंतर आता जमावाने आणखी एका तरुणाला संपवलं

गेल्या आठवड्यात दीपू चंद्र दास यांना संपवण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच, आता अमृत मंडल (वय 29) या हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून संपवलं आहे.

Bangladesh Hindu Violence : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र सुरूच; दीपू दासनंतर आता जमावाने आणखी एका तरुणाला संपवलं

Bangladesh Hindu Violence : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या आठवड्यात दीपू चंद्र दास यांना संपवण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच, आता अमृत मंडल (वय 29) या हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून संपवलं आहे. राजबारी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

राजबारी जिल्ह्यातील पांगशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी अमृत मंडल याच्यावर खंडणीचा आरोप केला आणि त्यानंतर जमावाने त्याला घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत मंडल हा 'सम्राट' नावाने ओळखला जात असे आणि तो एका स्थानिक गटाचा प्रमुख होता. मात्र, त्याच्या मृत्यूमुळे बांगलादेशातील जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – Udaipur Crime : वाढदिवसाच्या पार्टीत CEO च्या गाडीत IT मॅनेजर महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण घटना डॅशकॅमवर कैद

हिंदूंची घरे जाळण्याचे सत्र सुरूच

केवळ हत्याच नव्हे, तर हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याचे प्रकारही वाढले आहेत रौजन भागात एका हिंदू कुटुंबाचे घर जाळण्यात आले. गेल्या पाच दिवसांत या परिसरात तब्बल सात हिंदू कुटुंबांची घरे जाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घर जाळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचा – Video: "हमासच्या नेत्याशी हस्तांदोलन केलं आणि काही तासांतच…" नितीन गडकरींनी सांगितला इस्माईल हनियेच्या हत्येपूर्वीचा थरार

दीपू दास मृत्यू  

गेल्या आठवड्यात मैमनसिंग शहरात 28 वर्षीय दीपू चंद्र दास या हिंदू कामगाराला जमावाने संपवलं होतं. त्याच्यावर ईशनिंदेचा (Blasphemy) आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने मृताच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले असून, आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. मानवाधिकार संघटना 'ऐन ओ सालिश केंद्र' (ASK) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025 या वर्षात बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 184 लोकांचा बळी गेला आहे. केवळ हिंदूच नाही, तर प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक संघटनांनाही लक्ष्य केले जात आहे. 'डेली स्टार' आणि 'प्रथम आलो' या वृत्तपत्रांच्या कार्यालयांना तसेच जुन्या सांस्कृतिक संस्थांना आग लावण्याच्या घटनांनी बांगलादेशाची प्रतिमा डागाळली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number