नाशिकचा स्वयंघोषित बाबा, कॅप्टन अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच तपासादरम्यान त्याच्या संबंधी अनेक मोठे मोठे खुलासे देखील होत आहेत. अशातच भोंदू अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन विभाग देखील कारवाई करणार आहे. अशोक खरात या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असून वनविभागाने देखील एसआयटीला पत्र दिले आहे. भोंदू अशोक खरात यांनी काही प्राण्यांची शिकार करून त्यांचा वापर त्याच्या अघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
यानंतर वनविभागाचे उपवन संरक्षक यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. यात एसआयटी चौकशी सुरू असताना याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत कारवाई करण्यासंदर्भात काही निष्पन्न झाल्यास तपास आणि कारवाईचे अधिकार असल्याचे नमूद केले आहे. वन्यजीव गुन्हे कारवाई करणे आवश्यक असल्यास वनविभागा मार्फत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- Thalapathy Vijay Net Worth : एखाद्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त संपत्ती थालापतीकडे; निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर
खरातला पोटाचा आजार?
तर अशोक खरात याचे एचआयव्ही रिपोर्ट्स नेगेटिव्ह आल्यानंतर खरातच्या आरोग्याबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. खरात याला पोटाचा आजार असल्याची माहिती उघडकीस झाली आहे. अशोक खरातच्या आजारावर शिवनिका संस्थेचे विश्वस्त डॉ. नंदकिशोर कातोरे यांनी दोन वेळा उपचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच डॉक्टरशी ओळख झाल्यानंतर खरातने विश्वस्त पदासाठी गळ घातल्याची कातोरे यांनी माहिती दिली. ऑपरेशन आणि उपचारांनंतर वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत खरातने संस्थेत समावेशासाठी आग्रह केला होता, असं देखील कातोरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र खरातशी फक्त डॉक्टर-रुग्ण नात्याशिवाय, इतर कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान खरातचा एसआयटी तपास सुरु असून त्या तपासातून नेमकं काय उघड होणार? याकडं लक्ष लागलं आहे.