गोंदियात थंडीचा कडाका वाढला

गोंदिया जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट सुरू आहे. गोंदियात थंडीचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा १३.०८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता गोंदियात हिवाळी ऋतुला खऱ्या अर्थान सुरूवात झाली असून जिल्हावासी गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. गोंदियामध्ये मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. दरम्यान जिल्ह्यात जोरदार गारांचा पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून तापमानाचा […]

गोंदियात थंडीचा कडाका वाढला

गोंदिया जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट सुरू आहे. गोंदियात थंडीचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा १३.०८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता गोंदियात हिवाळी ऋतुला खऱ्या अर्थान सुरूवात झाली असून जिल्हावासी गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.

गोंदियामध्ये मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. दरम्यान जिल्ह्यात जोरदार गारांचा पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून तापमानाचा पारा घसरल्यामुळे जिल्हावासियांना थंडीची हुडहुडी भरली आहे. तर ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत थंडीचा आनंद घेत आहेत.

गोंदियात अवकाळी पाऊस

गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी गारांसह अवकाळी पावसाने आपले रौद्र रुप दाखविल्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी गावात गारासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number