IND vs AFG 3rd ODI : अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठे बदल; गौतम गंभीरने लावलेला वशिला यशस्वी? ‘लाडक्या खेळाडू’ला टीम इंडियामध्ये एन्ट्री

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना शनिवार 20 जून रोजी होणार आहे. मात्र अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियात बीसीसीआयकडून काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

IND vs AFG 3rd ODI : अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठे बदल; गौतम गंभीरने लावलेला वशिला यशस्वी? ‘लाडक्या खेळाडू’ला टीम इंडियामध्ये एन्ट्री

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने भक्कम पकड मिळवत विजय मिळवला आहे. दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना शनिवार 20 जून रोजी होणार आहे. 

मात्र अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियात बीसीसीआयकडून काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यावेळी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघातून बाहेर काढण्यात आले असून युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाची संघात एन्ट्री झाली आहे. ज्याप्रमाणे जखमी विराटच्या जागेवर जयस्वालला संधी मिळाली. तसंच हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार असा सवाल समोर उपस्थित केला जात होता.

हेही वाचा- IND vs AFG: ‘इंडिया ए’चा अफगाणिस्तानवर 101 धावांनी दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थान गाठत अंतिम फेरीत धडक

अशातच तिसऱ्या वनडेपूर्वी हर्षित राणा याला टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे, अशी माहिती खुद्द बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे तो तिसरा वनडे सामना खेळेल, एवढं नक्की. अशातच गंभीरने वशिला लावून पुन्हा हर्षित राणाला प्रयोरिटी दिलीये, अशी चर्चा होताना दिसते आहे. तसेच हर्षितने सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपले पुनर्वसन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी सामन्यात त्याच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number