शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. तसेच दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली. मात्र, आत्महत्या झाल्याचे दाखवण्यात येत आहे. दिशा आत्महत्या का करेल? तसेच तीचा शवविच्छेदन अहवाल का आल नाही? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच दिशा सालियनच्या हत्येचे सत्य सुशांत सिंग राजपूतला समजले, त्यामुळे सुशांत सिंग हे सत्य समोर आणणार होता. म्हणूनच सुशांत सिंगचीसुद्धा हत्या करण्यात आली, असे नारायण राणे म्हणाले.
वाघ गेले आणि मांजर आले, असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मला राजकारण शिकवू नये. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही, परंतु दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असले तर लोककल्याणकारी कामे करा. तसेच सभागृहात, मंत्रालयात न जाणारा असाही मुख्यमंत्री असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. कोरोना काळात इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. याचे ह्यांना काही वाटत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.