T20 World Cup 2026: महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया जाहीर! हरमनप्रीतकडे नेतृत्वाची कमान, तर मानधनाला महत्त्वाची जबाबदारी; जाणून घ्या

महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया सज्ज.

T20 World Cup 2026: महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया जाहीर! हरमनप्रीतकडे नेतृत्वाची कमान, तर मानधनाला महत्त्वाची जबाबदारी; जाणून घ्या

Team India squad Womens T20 World Cup 2026: महिला टी20 विश्वचषक 2026 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय संघ 14 जून रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे.भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत हरमनप्रीतने आपल्या नेतृत्वगुणांनी संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. तिच्या अनुभवाचा फायदा या मोठ्या स्पर्धेत संघाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सलामीवीर म्हणून मानधनाची आक्रमक फलंदाजी भारतासाठी मोठी ताकद ठरते. मैदानावर तिचा आत्मविश्वास आणि स्थिर खेळ संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम समतोल साधण्यात आला आहे. शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया यांच्यासारख्या खेळाडूंवर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर गोलंदाजी विभागात रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव, श्रेयंका पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.यावेळी निवड समितीने काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. भारती फुलमाळी, श्रीचरणी, नंदिनी शर्मा, क्रांती गौड यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळाल्याने नव्या उर्जेची भर पडणार आहे.महिला क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय संघाकडून यंदा चाहत्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. मागील स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाला यावेळी विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे.

भारतीय महिला संघ 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number