Suryakumar Yadav On Retirement : "निवृत्तीचा विचार…" निवृत्तीबाबत सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य; गंभीरच्या उपस्थितीत म्हणाला,

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Suryakumar Yadav On Retirement : &quotनिवृत्तीचा विचार…&quot निवृत्तीबाबत सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य; गंभीरच्या उपस्थितीत म्हणाला,

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवत आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवची प्रतिमा, भारताच्या टी-20 विश्वचषक 2026 च्या विजयाचे निर्णायक चित्र बनली आहे. यावेळी सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून चोख कामगिरी पार पडली. त्याने प्रत्येक सामना आणि त्यादरम्यान संघातील खेळाडूंना संयमाने हाताळले. टी-20 विश्वचषक 2026 चा किताब जिंकल्यानंतर आता सर्वत्र सूर्याच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. 35 वर्षीय सूर्यकुमार यादव या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? यावर त्याने स्वतः भाष्य केलं आहे. 

हेही वाचा- Arshdeep Singh-Daryl Mitchell Controversy : अर्शदीपची 'ती' कृती अन् मिशेलला राग अनावर! काही सेकंदांसाठी मैदानातील वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?
टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्याच्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्यावेळी निवृत्तीबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, "जेव्हा सर्व काही इतके चांगले चालले आहे, तेव्हा निवृत्तीचा विचार का करायचा?" असं म्हणत त्यान चाहत्यांना दिलासा दिला आहे की, तो इतक्यात क्रिकेटला सोडणार नाही आणि कुठेही जाणार नाही. 

हेही वाचा- Suryakumar Yadav : टीम इंडियाने कोरलं T20 विश्वचषकावर नाव, कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या 'त्या' कृतीमुळे क्रिकेटप्रेमी भावूक
फायनलमध्ये सूर्याची कामगिरी 
सूर्यकुमार यादवने टी20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत 9 सामन्यांमध्ये एकूण 242 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचा शेवटचा सामना फलंदाज म्हणून निराशाजनक होता. तो धावा न करता बाद झाला. सूर्या टीम इंडियासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number