जहांगीरपुरीमध्ये कारवाई थांबविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्लीत हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून जहांगीरपुरीमध्ये तोडक कारवाई थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नवी दिल्लीतील जहांगीरपुरीमधील बुलडोझर कारवाई वादात आली आहे. २० एप्रिल रोजी जहांगीपुरीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या महापालिकेला कारवाई थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. रहिवाशांना नोटीस […]

जहांगीरपुरीमध्ये कारवाई थांबविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्लीत हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून जहांगीरपुरीमध्ये तोडक कारवाई थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

नवी दिल्लीतील जहांगीरपुरीमधील बुलडोझर कारवाई वादात आली आहे. २० एप्रिल रोजी जहांगीपुरीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या महापालिकेला कारवाई थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. रहिवाशांना नोटीस न देताच झालेल्या या कारवाईला काल सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. दरम्यान, आज याप्रकरणी सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाईची स्थगिती कायम ठेवली आहे. तसेच याप्रकरणी पुढील आठवड्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

काय आहे प्रकरण?

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी दगडफेक, गोळीबारसुद्धा झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली असून परवानगी नसताना मिरवणूक काढल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहेत. दरम्यान, जहांगीरपुरीतील दंगलखोरांची बेकायदेशीर असलेली बांधकामे पाडण्याची मागणी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महापौरांना केली तसेच पत्राची एक प्रत पालिका आयुक्तांना पाठवण्यात आली होती. त्यांनतर दिल्ली महापालिकेकडून ९ बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिम करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दणका देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number