IIT Website Hacked : प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्याने हॅक केली IIT ची वेबसाईट; पोलिसांत तक्रार करण्याऐवजी संस्थेने दिली ‘ही’ अनोखी ऑफर

IIT कानपूरच्या बी.टेक सायबरसुरक्षा प्रवेश प्रक्रियेअंतर्गत हॅकाथॉन आयोजित करण्यात आले होते. या हॅकाथॉनमध्ये संबंधित विद्यार्थी आपली प्रतिभा सिद्ध करण्यात अपयशी ठरला होता.

IIT Website Hacked : प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्याने हॅक केली IIT ची वेबसाईट; पोलिसांत तक्रार करण्याऐवजी संस्थेने दिली ‘ही’ अनोखी ऑफर

IIT Kanpur Website Hacked: बी.टेक सायबरसुरक्षा (Cybersecurity) अभ्यासक्रमात प्रवेश नाकारल्यानंतर संतप्त झालेल्या एका विद्यार्थ्याने चक्क IIT कानपूरची अधिकृत वेबसाइटच हॅक केली. हॅकिंगनंतर त्याने पोर्टलवर 'Site is Hacked, All I Need is Just a Fair Chance' असा संदेश लिहून आपल्या कौशल्याचे पुरावे X (ट्विटर) आणि Reddit वर पोस्ट केले. या धक्कादायक प्रकारानंतर कायदेशीर कारवाई अथवा एफआयआर (FIR) दाखल करण्याऐवजी IIT कानपूरचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करत अत्यंत समजूतदार निर्णय घेतला. संस्थेने त्याच्यावर कठोर कारवाई टाळत C3iHub मध्ये थेट इंटर्नशिप देण्याचा विचार सुरू केला आहे.

हॅकाथॉनमधील अपयशानंतर विद्यार्थ्याने घेताल मोठा निर्णय  
प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, IIT कानपूरच्या बी.टेक सायबरसुरक्षा प्रवेश प्रक्रियेअंतर्गत हॅकाथॉन आयोजित करण्यात आले होते. या हॅकाथॉनमध्ये संबंधित विद्यार्थी आपली प्रतिभा सिद्ध करण्यात अपयशी ठरला होता आणि त्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता. प्रवेश प्रक्रिया 1 वेळा पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर आणि प्रशासकीय मर्यादांमुळे त्याला थेट प्रवेश देणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वतःची ताकद दाखवण्यासाठी त्याने वेबसाइट हॅक करण्याचा हा अयोग्य मार्ग निवडला.

FIR रद्द करत गुणवत्तेला दिली संधी; C3iHub मध्ये मिळणार इंटर्नशिप
सुरुवातीला या हॅकिंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचा विचार चालू होता. मात्र, विद्यार्थ्याचे नुकसान टाळून त्याच्या दाव्यांची व कौशल्याची सत्यता पडताळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याआधीही सीबीएसई (CBSE) पोर्टल मधील सुरक्षा त्रुटी शोधणाऱ्या एका संशोधकाला IIT कानपूरच्या C3iHub केंद्रात काम करण्याची संधी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यालाही C3iHub मध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार असून, तो पुढील वर्षी  पुन्हा नियमित प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहे.

हेही वाचा – Government Scheme For Women : सरकारची आश्वासनपूर्ती! आता महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 2500 रुपये; 1 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू

इतर विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्ग अवलंबण्याचे IIT कानपूरचे आवाहन
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच अशा बेकायदेशीर कृतींना प्रोत्साहन मिळू नये, याचीही काळजी संस्थेने घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नेहमी योग्य व कायदेशीर प्रक्रियेचाच वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सायबरसुरक्षा क्षेत्रातील इतर गुणवंत तज्ज्ञांनी आपले सीव्ही (CV) पाठवल्यास त्यांचा C3iHub मधील नोकरी किंवा इंटर्नशिपसाठी सकारात्मक विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number