Crime : 60 रुपयांसाठी आईला संपवलं; मग ओलांडली क्रूरतेची सीमा, मृतदेहासोबतच…; लेकाचं धक्कादायक कृत्य

मुलाने मागितलेले अवघे 60 रुपये आईने दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन एका नराधम मुलाने आपल्याच आईची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेसातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. 60 रुपयांवरून वाद टोकाला मिळालेल्या माहितीनुसार, मोहन यादव (वय28) असे या निर्दयी मुलाचे नाव आहे, त्याने […]

Crime :  60 रुपयांसाठी आईला संपवलं; मग ओलांडली क्रूरतेची सीमा, मृतदेहासोबतच…; लेकाचं धक्कादायक कृत्य
60 रुपये न दिल्याने मुलाने आईला संपवलं

मुलाने मागितलेले अवघे 60 रुपये आईने दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन एका नराधम मुलाने आपल्याच आईची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेसातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.

60 रुपयांवरून वाद टोकाला
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन यादव (वय28) असे या निर्दयी मुलाचे नाव आहे, त्याने आपली 51 वर्षीय आई मूला देवी यांच्या मानेवर थेट कुऱ्हाडीने पाचपेक्षा अधिक वेळा सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. मुलाला हत्येनंतर त्याला जराही पश्चाताप झाला नाही. तो तब्बल दोन तास आपल्या आईच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिलेला होता.

हेही वाचा-Crime : मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर; गावकऱ्यांनी कुटुंबासोबतच…; अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनला गांजाचे व्यसन होते. तो दररोज नशेसाठी आईकडे पैशांची मागणी करत तिला त्रास देत होता. घटनेच्या दिवशी घरात कोणीही नव्हते. त्याने नेहमीप्रमाणे आईकडे 60 रुपये मागितले होते. घरात पैसे नसल्याने मूला देवी यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मोहनने घरात असलेली कुऱ्हाड घेत आईच्या मानेवर अमानुषपणे वार करण्यास सुरुवात केली.

घटनेचा उलघडा कसा झाला?
या हल्ल्यात मूला देवी यांचा जागीच मृत्यू झाला.या सर्व प्रकाराचा उलगडा हा मोहनचे काका रामेश्वर घरी आल्यानंतर झाला. त्याच वेळी मूला देवा यांचा मोठा मुलगा सोहन यादव हा त्याच्या पत्नीला नोएडाला सोडून गावी आला होता. जेव्हा सोहनने घरात पाऊल ठेवले तेव्हा आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने एकच हंबरडा फोडला.

हेही वाचा-Beed Crime: किरकोळ वादाचा भयंकर शेवट! घरात घुसून कुटुंबावर हल्ला; मारहाणीत वृद्धाचा अखेर मृत्यू, बीडमध्ये खळबळ

सोहनच्या ओरडण्यचा आवाज ऐकून शेजारी आणि ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पथकासह पोहचल्यानंतर आरोपी मोहनला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करुन मृतदेहा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number