Shoaib Akhter: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कालची रात्र दिवाळी साजरी करण्यासारखी ठरली आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाची ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेल्या 256 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंड अवघ्या 159 धावांवर गारद झाला. यावेळी भारताच्या फलंदाजांकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्म आणि ईशान किशन यांनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू मैदानावर चालली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवत आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवची प्रतिमा, भारताच्या टी-20 विश्वचषक 2026 च्या विजयाचे निर्णायक चित्र बनली आहे. एकंदरीत पाहायच झालं तर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला. तसेच यावेळी जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच आणि संजू सॅमसनने मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार पटकावला. टीम इंडियाच्या विजयी जल्लोषाकडे पाहता पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी शोएब अख्तर म्हणाला की, "असं पण असू शकल असत की, पैशांचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी नाही झालं, रणजी ट्रॉफी जिंकलेले खेळाडू पैसे नाही कमवत का? गौतम गंभीरने हे सिद्ध करून दाखवलं की, दोन खेळाडूंच्या सहाय्याने पुर्ण टी20 विश्वचषक जिंकता येऊ शकतो. एक होता संज सॅमसन, त्याच्यावर विश्वास होता आणि त्याला वरच्या क्रमात फलंदाजीसाठी पाठवणे हा एक उत्तम निर्णय होता. आज भारताने हे सिद्ध केलं की आम्ही योग्य खेळाडूला संधी देतो. 15 खेळाडू निवडले जातात. त्यात अनेक खेळाडू वगळले जातात. त्यात दिग्गज खेळाडूंचाही समावेश केला जाते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे उदाहरण घ्या…त्यांनी दोघांनाही वगळले आणि आता विश्वचषक जिंकला आहे. भारतात ज्या पद्धतीने क्रिकेट पायाभूत सुविधा बांधल्या जात आहेत ते कौतुकास्पद आहे. भारताला जर आगामी 2027 चा विश्वचषक आजच मिळत असेल तर तो त्यांनी आजच घेऊन टाकावा" असं म्हणत शोएब अख्तरने टीम इंडियाच्या कामगिरीचे, प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निवड प्रक्रियेचे आणि संघाच्या रणनीतीचे कौतुक केले.