मुंबई: आनंद एल. राय यांच्या 'अतरंगी रे' या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांच्यासोबत दिसलेली अभिनेत्री डिंपल हयातीविरुद्ध हैदराबादमधील फिल्म नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिंपल आणि तिचा पती व्हिक्टर डेव्हिड यांच्यावर त्यांच्याकडे काम करणाऱ्या दोन महिलांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या घरातील काम करणाऱ्या एका महिलेने डिंपल आणि तिच्या पतीने तिचे नग्न व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
डिंपल हयाती आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
सध्या पोलिसांनी डिंपल यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन डिंपल आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. वृत्तानुसार, ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील 22 वर्षीय प्रियांका बिबरने डिंपल आणि व्हिक्टरवर आरोप केला आहे की, बंजारा हिल्समधील वेस्टवुड अपार्टमेंटमध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून ते दोघे तिला सतत अपमानित करत होते. प्रियांकाने सांगितले की, तिला पुरेसे जेवण दिले जात नव्हते. तसेच हे जोडपे तिला खूप काम करायला लावतं होते आणि कुत्र्यांसारखं वागवतं होते.
डिंपल हयाती आणि तिचा पती व्हिक्टरवर आरोप
डिंपल हयातीच्या घरातील नोकर प्रियांकाने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी देखील करते, जसे की 'तुझे आयुष्य माझ्या बुटांच्याही लायक नाही'. तसेच तिला वारंवार शिवीगाळ देखील करते. 29 सप्टेंबर रोजी प्रियांकाचा डिंपलशी एका गोष्टीवरुन वाद झाला, त्यानंतर त्या जोडप्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रियांकाने ही घटना रेकॉर्ड करण्यासाठी तिचा मोबाईल फोन काढला तेव्हा तो हिसकावून घेतला गेला आणि फोडण्यात आला.
हेही वाचा: Vishal Brahma: स्टुडंट ऑफ द इयर 2 फेम अभिनेत्याला चेन्नई विमानतळावर अटक, 40 कोटी रुपयांचे मेथाकॅलोन ड्रग्ज जप्त
नोकरांना मारहाण केल्याप्रकरणी डिंपल आणि व्हिक्टरवर गुन्हा दाखल
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तेलुगू अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिच्या पतीवर हैदराबादमधील फिल्मनगर पोलिस ठाण्यात ओडिशातील त्यांच्या दोन नोकरांना त्रास दिल्याबद्दल आणि गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी करत आहेत.
डिंपल हयातीची अभिनयातील कारकीर्द
डिंपल हयातीने अतरंगी रे, खिलाडी आणि वीरमे वागाई सूदूम सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2017 मध्ये 'गल्फ' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात डिंपल व्यतिरिक्त, शिवा कार्तिक आणि चेतन मद्दिनेनी देखील आहेत.