एसीबीआयच्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

एसबीआयच्या खातेधारकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून एसबीआय एटीएमबाबतीत नवा नियम लागू करत आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी तसेच एटीएमद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. काय आहे नवा नियम ? एसबीआयच्या नव्या नियमानुसार, सकाळी […]

एसीबीआयच्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

एसबीआयच्या खातेधारकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून एसबीआय एटीएमबाबतीत नवा नियम लागू करत आहे.

या नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी तसेच एटीएमद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काय आहे नवा नियम ?

एसबीआयच्या नव्या नियमानुसार, सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान एटीएमद्वारे पैसै काढण्यासाठी मोबाईलवर ओटीपी (one time password ) पाठवण्यात येणार आहे.

या ओटीपीद्वारे अकाउंटमधून पैसे काढता येणार आहेत. हा नियम केवळ 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्यांसाठी असणार आहे.

यासाठी खातेधारकांचा मोबाईल नंबर बँक खात्याशी संलग्न असणं बंधनकारक असेल. याबाबतची माहिती एसबीआयने ट्विटद्वारे दिली आहे.

ज्या खातेधारकांचा नंबर बॅंक खात्याशी जोडलेला नसेल त्यांनी बँक खात्याशी मोबाईल नंबर अपडेट करुन घ्यावा. ज्यामुळे ऐनवेळी गैरसोय होणार नाही.

बॅँकेकडून पाठवण्यात येणारा ओटीपी हा काही सेकंदांसाठी असणार आहे. त्यामुळे हा ओटीपी एटीएम व्यवहारासाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा ओटीपी कोणासोबतही शेअर करु नये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number