राऊतांचा पायगुण, समितीसाठी अवगुण

कर्नाटक निवडूणुकीसाठी राऊतांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, राऊतांच्या प्रचारानंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे, राऊतांचा पायगुण, समितीसाठी अवगुण असं म्हटलं जात आहे. कर्नाटकच्या सीमा भागात जोरदार प्रचार करूनही महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सीमा प्रश्न सोडवण्यात महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारला अपयश आल्याने या निवडणुकीत भाजपाला मतदान […]

राऊतांचा पायगुण, समितीसाठी अवगुण

कर्नाटक निवडूणुकीसाठी राऊतांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, राऊतांच्या प्रचारानंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे, राऊतांचा पायगुण, समितीसाठी अवगुण असं म्हटलं जात आहे.

कर्नाटकच्या सीमा भागात जोरदार प्रचार करूनही महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सीमा प्रश्न सोडवण्यात महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारला अपयश आल्याने या निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असा प्रचार उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीला मते द्या, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मतदारांनी हे आवाहन धुडकावून लावत एकीकरण समितीच्या उमेदवारांना मते दिली नाहीत.

सीमावर्ती भागात मराठी माणसाच्या लढ्याला जोरदार धक्का बसलाय. म ए समितीचे एकूण ६ उमेदवार मैदानात होते. म ए समितीचे उमेदवार पराभूत झालेत. समितीच्या उमेदवारांचा बहुतांश पराभव काँग्रेसकडून झाला आहे. तर, भाजपाकडूनही म ए समितीच्या काही उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे, संजय राऊतांचा प्रचार हा अपयशी ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number