‘सरकारने पत्रकारांसाठी विशेष योजना आणावी’

पत्रकार हा सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतो. पत्रकारामुळे लोकशाही आणि स्वातंत्र्य जिवंत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांसाठी त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आणावी असे मला वाटते, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ‘या विषयावर मी आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे’, असंदेखील राऊत यावेळी म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालय या संदर्भात आता […]

‘सरकारने पत्रकारांसाठी विशेष योजना आणावी’

पत्रकार हा सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतो. पत्रकारामुळे लोकशाही आणि स्वातंत्र्य जिवंत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांसाठी त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आणावी असे मला वाटते, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ‘या विषयावर मी आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे’, असंदेखील राऊत यावेळी म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालय या संदर्भात आता सक्रिय झाले आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र हे थोडे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्राला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला हवा तो होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारून काय करणार, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती गठित केली पाहिजे जी केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाला एकत्र करून काम करेल, जेणेकरून राज्यांवर अन्याय होणार नाही’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

जर राजकारण बाजूला ठेवून काम केले तरच देश वाचेल’, असंदेखील राऊत यावेळी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number