शिवसैनिक संजय पवारांना मैदानात आणायची पक्षाची तयारी

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील तिढा कायम आहे. शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी निवडणूक लढणार नसल्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे यांना वाटाण्याच्या अक्षता की दबावतंत्र?  असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक संजय पवार यांना मैदानात आणण्याची तयारी शिवसेना पक्षाची सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून […]

शिवसैनिक संजय पवारांना मैदानात आणायची पक्षाची तयारी

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील तिढा कायम आहे. शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी निवडणूक लढणार नसल्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे यांना वाटाण्याच्या अक्षता की दबावतंत्र?  असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक संजय पवार यांना मैदानात आणण्याची तयारी शिवसेना पक्षाची सुरू आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून संजय पवार यांच्या नावासाठी जोर लावला जात आहे. तसेच शिवसेनेने कार्यालयीन पातळीवर संजय राऊत यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेसाठी सहाव्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे राज्यसभेसाठी संभाजीराजे यांना उमेदवारी मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी संभाजीराजे कोल्हापूर बालेकिल्ल्यातच निष्ठावंत शिवसैनिक समजले जाणारे संजय पवार यांच नाव चर्चेत आले आहे.

संजय पवारांचा परिचय

गेली तीन दशके शिवसेनेत सक्रिय.


संजय पवारांच्या रूपाने छत्रपतींसमोर सामान्य मराठा मैदानात.


शिवसेनेच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाची ९ वर्षांपासून जबाबदारी.


संजय पवार कोल्हापूर मनपात तीनवेळा नगरसेवक.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number