महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदवीर भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि निलेश साबळे अडचणीत सापडले आहेत. या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
संभाजी ब्रिगेडने ही तक्रार दाखल केली आहे.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरमध्ये तक्रार दाखल केली आहे.
संभाजी ब्रिगेडने सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांची नक्कल करत विनोदनिर्मिती केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांचे फोटो एडिट करुन त्यांच्या जागी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचे फोटो लावण्यात आले होते.
यासर्व प्रकरणानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप पाहायाला मिळाला. निलेश साबळेने माफी मागावी, अशी तीव्र भावना सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळे यांना फटकारले होते.
दरम्यान लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर निलेश साबळे याने व्हिडिओद्वारे माफी मागितली. माफी मागितली असली तरी त्यांच्या अडचणी संपल्या, असं वाटत नाही.
दरम्यान याआधी आगरी समाजाबद्दलही चला हवा येऊ द्यामधून टीका करण्यात आली होती.