Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राकेशने केलं तन्वीला किस, राखी चवताळली; स्वत:ला दिली एवढी मोठी शिक्षा की, संपूर्ण घर हादरले

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सध्या नवा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. राखी सावंतला पाहून नेटकऱ्यांसह घरातील सदस्यांमध्ये देखील खळबळ माजली आहे. 

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राकेशने केलं तन्वीला किस, राखी चवताळली; स्वत:ला दिली एवढी मोठी शिक्षा की, संपूर्ण घर हादरले

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या मराठी बिग बॉस मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस पडत आहे. बिग बॉस मराठी 6 च्या घरातून आतापर्यंत सचिन कुमावत, आयुष संजीव, करण सोनावणे आणि दिव्या शिंदे हे सदस्य बाहेर पडले आहेत. बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही वाइल्ड कार्ड एन्ट्री अभिनेत्री राखी सावंतची झाली असून तिने नागिण’ अवतारात घरात प्रवेश केला. पहिल्या दिवसापासून तिचा ड्रामा सुरू झाला असून तिने घरातील इतर सदस्यांना सळो की पळो करून सोडलं. अशातच ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरात सध्या नवा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात राखी सावंतला पाहून नेटकऱ्यांसह घरातील सदस्यांमध्ये देखील खळबळ माजली आहे. 

हेही वाचा- Friday OTT Release: विकेंडची मेजवानी; मराठी मातीची गोष्ट ‘क्रांतिज्योती विद्यालय’ ते ‘अक्यूज्ड’ या शुक्रवारी ओटीटीवर काय पाहाल?
कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडच्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट व तन्वी कोलते रोमँटिक डान्स करताना पाहायला मिळाले आहेत. यावेळी राकेशने तन्वीच्या गालावर किस केल्याचे दिसून आले. राकेशने तन्वीला किस केल्याचे पाहताच राखीच्या तळ पायाची आग मस्तकात गेल्याचे पाहायला मिळाले. राखी तावातावात तन्वीला विचारते, ‘हा कुठला डान्स आहे?’ त्यावर तन्वी तिला ओरडून म्हणते ‘तू त्याला विचार ना,’. तन्वी आणि राकेशला एकत्र पाहताना राखी डोळे बंद करते.

डान्स संपल्यानंतर राकेश राखीसमोर तन्वीला पुन्हा किस करतो. त्यानंतर राखी चिडते आणि आता तू परिणाम बघ असं म्हणते. त्यानंतर खरा ड्रामा सुरु होतो. राखी सावंत हातात कात्री घेते आणि आरशासमोर उभी राहून रागात स्वतःचे केस कापते. हा प्रकार समजताच घरातील इतर सदस्य राखी जवळ धावत येतात. राखीला केस कापताना बघत राकेश तिला विचारतो ‘राखी’ तू हे काय करतेय, त्यावर राखी म्हणते, “राकेश, मी स्वतःला शिक्षा देतेय, मला कोणीच हर्ट करू शकत नाही, फक्त मीच मला हर्ट करू शकते,’ असं म्हणत राखी रडू लागते. त्यानंतर दिपाली राखीला मिठी मारते आणि सांभाळताना दिसते. तर दुसरीकडे राकेश बापट अवाक् होऊन तिच्याकडे पाहत उभा असतो. राखी सावंतच्या ड्रामामुळे घरात काय घडणार, ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number