‘राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव’ – धनंजय मुंडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच ईडी घुसली आणि अर्दवटराव गप्प बसले असेही मुंडे म्हणाले. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. […]

‘राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव’ – धनंजय मुंडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच ईडी घुसली आणि अर्दवटराव गप्प बसले असेही मुंडे म्हणाले.

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवत आहात, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचूचा ओम फट स्वाहा’ करणार आहेत. राजसाहेबांनी हे दणादण करायला आता कुठे सुरूवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. गेट वेल सून धनंजय मुंडे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number