राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. कोर्टाचा […]

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर गुरुवारपासून काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक झाली होती. मात्र, संसदेत अदानी प्रकरणावरुन आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप अत्यंत आक्रमक असल्याचे दिसत आहे.

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकात बोलताना एक वक्तव्य केले होते. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार पुर्निश मोदी यांनी त्यांच्यावर एक खटला दाखल केला होता. गुरुवारी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पण, राहुलला त्वरित कोर्टाकडून ३० दिवसांचा जामीन मिळाला. मात्र, पुढील ३० दिवसांत त्यांना हायकोर्टात या शिक्षेच्या विरुद्ध याचिका दाखल करावी लागेल.

दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन वर्षांहून अधिकची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर खासदार, विधानसभेचे सदस्यत्व रद्द होते. संविधानाच्या अनुच्छेद १०२ (१) आणि १९१ (१) नुसार हे सदस्यत्व रद्द करण्यात येते. लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात दोषी आढळल्यास त्याची खासदारकी रद्द करण्यात येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number