पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मेट्रो २ A आणि मेट्रो ७ चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन २०२४ च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number